मुंबईतून लोकप्रतिनिधी सिंधुदुर्गात येतात कसे?सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचा सवाल
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोन जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे मुंबईतून आलेल्या आमदार नितेश राणे यांनी स्वतःला होम कोरंटाईन करून घेतले; मात्र मुंबई रेड झोनमध्ये असतानाही तिथून आलेले खासदार विनायक राऊत, अतुल रावराणे हे जिल्ह्यात बिनदिक्कत फिरत आहेत. खासदार हुसेन दलवाई यांनीही आपली काही माणसे खारेपाटण येथे येऊन जिल्ह्यात पाठवली. त्यामुळे जनतेला एक न्याय आणि नेत्यांना दुसरा असे प्रशासनाने न करता अशा पद्धतीने फिरण्यास आळा घालावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केली.
www.konkantoday.com