बीडीएस परीक्षेत परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरचे यश
जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत (बीडीएस) दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमधील 3 विद्यार्थ्यांनी रौप्य व 8 विद्यार्थ्यांनी कास्यपदक पटकावले.
अभ्यंकर विद्यामंदिरातील रौप्य पदक प्राप्त विद्यार्थी असे- हर्ष सागर ढवळे (गुण 91), प्राप्ती बाबा अनुसे (89), सर्वेश विद्याधर गोठणकर (92). कास्यपदक प्राप्त विद्यार्थी- आर्य धनंजय दांडेकर (85) वेदश्री विश्वनाथ चिले (85) पूर्वा प्रणव अभ्यंकर (83), श्रेय संदीप शेटे (85), ज्ञानराज समीर वंडकर (84), राजमुद्रा मंगेश मोंडकर (84), श्रावी विनोद तेरेदेसाई (83) आणि श्रीधर मंगेशकुमार पाटील (83)
या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी फॉर्म शाळेतून पाठवले जातात. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी कोणताही जादा क्लास न करता शाळेत शिकवलेल्या अभ्यासाच्या आधारे तसेच पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने यश प्राप्त केले आहे. शाळा गुणवत्ता शोध परीक्षेसाठी जादा क्लास घेते. त्याचाही इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना उपयोग झाला आहे. गुणवत्ता शोध परीक्षेचा निकाल 1 मे रोजी जाहीर होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षक, पालकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परूळेकर, कार्याध्यक्ष अॅड. सौ. सुमिता भावे, सेक्रेटरी सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, व्यवस्थापक दिलीप भातडे, संचालक सौ. विशाखा भिडे, जयंत प्रभुदेसाई, सीईओ सुमित्रा बोडस, मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी अभिनंदन केले. लॉकडाऊनमुळे सध्या शाळेला सुट्टी असल्याने शिक्षक व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.