चिपळूण कोंढे रेशन दुकानात सवलतीच्या धान्याचा अपहार ,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण कोंढे येथे चिपळूण विविध कार्यकारी सोसायटीचे सरकारमान्य रास्तभाव दुकानात लाभार्थींसाठी असलेले सवलतीच्या दराचे धान्य न देता धान्याचा अपहार केला म्हणून अमित खेडेकर ,दिलीप हरी माटे राहणार कामथे यांच्याविरुद्ध चिपळूण तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला आहे.शासनाच्या धोरणाप्रमाणे यातील सर्फराज काेथळकर,वसंत लोलम ,शांताराम लोलम ,जैनाबी कोथळकर ,मोहन लोलम , रवींद्र लोलम आदींना सवलतीच्या दरात धान्य मिळणे आवश्यक होते परंतु या लाभार्थींना धान्य न देता त्यांच्या धान्याचा अपहार केला म्हणून या दोघांविरुद्ध चिपळूणच्या तहसिलदारांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantody.com