कोरोनामुळे रत्नागिरीसह पाच जिल्यात मोबाईल मार्केटवर परिणाम,अदांजे २५ काेटीचा फटका
कोरोनामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमधील मोबाईल मार्केटवर खूप मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. सर्व साधारणपणे या पाच जिल्ह्यात मिळुन दररोज सुमारे ५०हजार मोबाईल संच आणि एक्सेसिरिज विकले जायचे. मात्र मार्च आणि एप्रिल हे दोन महिने लॉकडाउनमुळे विक्री पूर्णपणे थांबली. गुढीपाडव्याला विक्री झालेली नाही. अक्षयतृतीयेचा मुहूर्तही तसाच जाणार त्यामुळे या पाच जिल्ह्यातील मोबाईल मार्केटला या दोन महिन्यात सुमारे २५ कोटींचा फटका बसलाआहे.
www.konkantoday.com