रत्नागिरी जिल्ह्य़ातील खाडीकिनारी मच्छीमारी करणाऱया छोटय़ा मच्छीमारांना शासनाने परवानगी द्यावी- निसार बोरकर
रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे समुद्रात मच्छीमारी करणार्यांना काही अटी घालून शासनाने परवानगी दिली आहे मात्र रत्नागिरी जिल्हय़ात अनेक खाडी किनारी गरीब पारंपरिक मच्छीमार खाडीतील मच्छी ,कालवे ,शिंपल्या खाण्याच्या व्यवसाय करीत असून त्यांच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खाडीकिनारी छोट्या गरीब मच्छीमारांना व्यवसायास परवानगी द्यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे निसार बोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांना निवेदन दिले आहे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की
केंद्र व राज्य सरकारने सध्याच्या लाॅकडाॅन कालावधी मध्ये मच्छी व्यवसायला सुट दिली आहे व मच्छिमारी व्यावसाय आपल्या आदेशानुसार सुरू झाले आहेत. माझी विनंती अशी आहे की समुद्रा लगत ज्या खाडी किनारी आहेत अशा खाडी मध्ये गरीब मच्छिमार सर्व जाती धर्माचे गरीब लोक खाडी किनारी मच्छि पकडणे, कालवी, शिंपल्या काढणे असे अनेक बारीकसारीक मेहनत घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. दैनंदिन आपली चूल पेटवून आपल्या गरीब कुटुंबाची पोटाची भूकभागवत असतात अशा परिस्थितीत ही गरीब माणसें आपला प्रपंच चालवित आले आहेत.
सध्याच्या लाॅकडाॅन मूळे गरीब मच्छिमार अडचणीत आला आहे. व त्याचे अतोनात हाल हाल होत आहेत तरी शासनाच्या आदेशानुसार खाडी किनारी रहाणार गरीब मच्छिमार याचा ही विचार होणे आवश्यक आहे. स आपणास विनंती आहे. कृपया आपण खाडी किनारी गरीब लोकांना व्यवसाय करण्यास मान्यता देण्यात यावी, विनंती आहे.
खाडी पट्या मध्ये मच्छिमारी करताना किंवा कालवी, शिंपलया काढताना सोशलडि्स्टनिंगचे पालन हे पूर्वी पासून परंपरागत चालत आलेला आहे. सदर व्यावसाय तसं आहे. तरी सुद्धा शासन नियमावली प्रमाणे सोशलडिस्टनिंग चे आपले गरीब मच्छिमार पालन नक्की करेल त्यांची आम्हाला खात्री आहे. तरी कृपया शासन नियमावली प्रमाणे आपणा मार्फत खाडी किनारी मच्छिमारी करणयास आदेशानुसार मान्यता देण्यात यावीअशी मागणी केली आहे
www.konkantoday.com