रत्नागिरी जिल्ह्यातून आता केवळ १५ जणांचा अहवाल प्रतीक्षेत
रत्नागिरी जिल्ह्यातून मिरज येथील प्रयोगशाळेत कोरोनाविषयक तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी आता केवळ १५ जणांचा अहवाल प्रतीक्षित आहे. बाकी सर्व अहवाल आले असून सर्व अहवाल नकारात्मक असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
मिरज येथे पाठवलेल्या नमुन्यांपैकी २७ जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कळंबणीतील ६, दापोलीतील ६ आणि जिल्हा रुग्णालयातील १५ जणांच्या अहवालचा समावेश आहे.
www.konkantoday.com