प्रशासनाकडून छोटय़ा मच्छिमारांवर कारवाई ,बड्या मच्छीमारांकडून नियम धाब्यावर
रत्नागिरी जिल्ह्यात काय विशिष्ट अटी घालून मच्छीमारी करण्यास शासनाने याचा परवानगी दिली आहे शासनाकडून अनेक नियम घातले घातले असले तरी या नियमात केवळ छोटे मच्छीमार सापडतात काही दिवसांपूर्वी राजीवडा खाडीत मच्छिमारी केली म्हणून छोट्या मच्छीमारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या नौका व झाला देखील जप्त करण्यात आल्या शासनाने आता मच्छीमारांना अनेक अटी घालून घालून परवानगी दिली आहे त्यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे खलाशांची संख्या, मात्र त्याबाबत मोठय़ा पर्ससीन नेट वाल्यांकडून नियम फाट्यावर मारले जात आहेत रत्नागिरी येथील मिरकरवाडा व साखरी नाटे येथील बड्या शेठ लाेकांच्या असलेल्या पर्ससीन नौकेवर मोठ्या संख्येने खलाशी असल्याची व ते नियम तोडून मच्छीमारी करीत असल्याच्या तक्रारी आहेत त्याकडे मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याची मच्छीमारांची तक्रार आहे पर्ससीन नौकांना परवानगी नसताना देखील .खुलेआम मच्छीमारी होत असल्याच्या तक्रारी असून त्यांना मत्स्य खात्याचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे त्यामुळे मत्सखात्याकडून गरीब छोटय़ा मच्छीमारांना वेगळा न्याय व बड्यांना वेगळा न्याय असे धोरण अवलंबिले जात असल्याने मच्छीमारांच्या नाराजी आहे
www.konkantoday.com