
मुंबई गोवा महामार्गा वरील खेड भरणे नजीकच्या पुनम सुपर हॉटेल समोर कारने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गा वरील खेड भरणे नजीकच्या पुनम सुपर हॉटेल समोर कारने ४० वर्षीय प्रौढाला दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्रौ ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली या अपघाता नंतर कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले
क्रिष्णा (बसवराज) हनुमंत भजंत्री वय ४० वर्षे रा. वार्ड नं. २२ सिंधनुर ता. सिंधनुर जिल्हा रायचुर राज्य कर्नाटक असे त्या मृत्युमुखी पडलेल्या प्रौढाचे नाव आहे तर याबाबत ची फिर्याद अंबाजी सुरेश पुजारी यांनी दिली
सुकी मिर्चीच्या व्यापारासाठी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक सद्गुरु ट्रान्सपोर्ट सातारा येथुन व्यापारासाठी भाडेतत्वावर घेतलेले वाहन क्रमांक के. ए. ५६ ४५५६ या बाराचाकी ट्रक वाहनातुन सातारा ते खेड असा प्रवास करत असताना खेड भरणे येथील पुनम सुपर हॉटेल येथे येवून गाडीतून उतरुन त्यांच्या वाहणाच्या बाजुला उभे असलेले नातेवाईक क्रिष्णा (बसवराज) हनुमंत भजंत्री य फिर्यादी यांच्या नातेवाईकाला मुंबई कडून गोव्याकडे जाणारे एक कार क्रमांक एम. एच. ४६ सी.ई. ०६८६ यावरील चालकाने जोरदार धडक दिली या धडकेत प्रौढा चा जागीच मृत्यू झाला.
www.konkantoday.com