
प्रसिद्ध व्यापारी सुधीर पटवर्धन आणि कुटुंबीया कडुन ५० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ५० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
शहराजवळील शांतीनगर येथील प्रसिद्ध व्यापारी सुधीर पटवर्धन यांनी पत्नी आणि मुलीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. कोरोनाच्या (कोविड-19) पार्श्वभूमीवर काजरघाटी (पोमेंडी खुर्द) येथे ५०कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
लॉकडाऊनमुळे लोकांना बाहेर पडता येत नसल्याने जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. रेशनवर गहू, तांदूळ मिळत असले तरी अन्य साहित्य आणण्यासाठी गावाबाहेर जावे लागत आहे. मात्र गावाच्या वेशीवर असणारे पोलिस ग्रामस्थांना अडवून परत पाठवत असल्याने जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून सुधीर पटवर्धन यांनी पत्नी सौ. सीमा पटवर्धन आणि मुलगी सिद्धी पटवर्धन यांच्या वाढदिवसानिमित्त गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याला काजरघाटी येथील पटवर्धन बंधूंनी मान्यता देत सहकार्याचे आश्वासन दिले. त्यानुसार काजरघाटी येथील वॉर्ड क्रमांक दोनमधील सर्व ५० कुटुंबीयांना डाळ, कांदे, बटाटे, तेल पिशवीचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या कल्पनेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या कार्यात त्यांना गिरीधर पटवर्धन, गजानन पटवर्धन, उल्हास पटवर्धन, दिलीप पटवर्धन, भावना पटवर्धन, ग्रामपंचायत सदस्य प्राची कांबळे, मानसी पटवर्धन यांच्यासह वॉर्ड क्रमांक दोनमधील तरुणांनीही उत्तम सहकार्य केले
www.konkantoday.com