नियम आणि अटींच्या आधारावर मासेमारीला परवानगी
नियम आणि अटींच्या आधारावर मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे केंद्राचे आदेश आल्यानंतर नियम आणि अटींच्या आधारावर मासेमारीला परवानगी देण्यात आली. मासेमारी सुरु झाल्यामुळे बंदरावर गर्दी होऊ नये म्हणून फक्त मच्छिमारीशी निगडित लोकांना बंदरावर प्रवेश दिला जाणार आहे. एकावेळी केवळ चार नौका मासळी उतरवण्यासाठी बंदरात आणल्या जाणार आहेत.मिरकरवाडा बंदरावर दोन जेट्टी रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. या दोन जेट्टी वर दोन दोन नौका अंतर ठेवून उभ्या ठेवल्या जाणार आहेत. मासे उतरून बर्फ आणि पाणी भरून रवाना होतील असे नियोजन करण्यात आले आहे. लिलावाच्या ठिकाणी अन्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे
www.konkantoday.com