नागरिकांची सोय व्हावी म्हणुन खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले पाहिजेत-ना.उदय सामंत
जिल्ह्यात काही खासगी डॉक्टरांनी सेवा बंद केली आहे. प्रशासनाने कारवाईचा इशारा देऊनही त्यांनी दवाखाने न उघडल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या डॉक्टरांवर कारवाई करू शकतो. मात्र डॉक्टर स्थानिक आहेत आणि अडचणीच्यावेळी त्यांनी आपल्याला मदत केली आहे. त्यामुळे गैरसोईमध्ये नागरिकांची सोय व्हावी, हे डॉक्टरांच्या मनातून आले पाहिजे आणि त्यांनी दवाखाने सुरू केले पाहिजेत, अशी अपेक्षा नामदार उदय सामंत यांनी व्यक्ती केली.
www.konkantoday.com