टनेल किंवा डोमचा वापर करू नये केंद्रीय आरोग्य विभागाची सूचना
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम किंवा टनेल यांचा वापर केला जात आहे.मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो. म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये, अशी सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.
www.konkantoday.com