
गोव्यातील कोरोना विषाणूबाधित सर्व रुग्ण झाले कोरोना मुक्त
देशात एकीकडे कोरोनाचे थैमान कमी होण्याचे नाव घेत नाही. तर दुसरीकडे एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गोव्यातील कोरोना विषाणूबाधित सर्व रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचे एकूण सात प्रकरणे समोर आली होती. यातील सहा यापूर्वीच बरे झाले होते. अखेरच्या रुग्णाचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टि्वट करून याविषयी माहिती दिली
www.konkantoday.com