उडान योजनेतून विमान वाहतुकीने आंब्याची निर्यात करावी -माजी आमदार बाळ माने
हापूस आंबा नाशिवंत माल असल्याने प्राधान्याने देशांतर्गत हवाई वाहतूक तसेच आखाती देश आणि युरोपमध्ये हापूस आंब्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी एअर फ्रेटचा दर प्रतिकिलो ५० रुपये करावा. तसेच उडान योजनेअंतर्गत रत्नागिरी, कुडाळ (परुळे, चिपी), गोवा, पुणे आणि मुंबई विमानतळ येथून हापूस आंबा पाठवण्याची तात्काळ उपाययोजना अपेडामार्फत करावी, राज्याच्या कृषी विभागामार्फत देशांतर्गत वाहतूक करावी, अशी मागणी माजी आमदार बाळ माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे
www.konkantoday.com