
माकडांची नसबंदी करा – सिंधुदुर्गातील माजी खासदारांची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीची होणारे नुकसानी लक्षात घेता सरकारने तातडीनं यावर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. यामध्ये प्रामुख्याने माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याबाबत सरकारने निर्णय घेऊन तशी परवानगी वन खात्याला द्यावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती माजी खासदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सध्यस्थितीत पावसाळी शेती हंगाम सुरू झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठं संकट म्हणजे वन्य प्राण्यांचा उपद्रव आहे. गेले कित्येक वर्षे जिल्ह्यात हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या संदर्भात मी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात नेमकी काय उपाययोजना करता येईल? यासंदर्भात माहिती घेतली. यामध्ये माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून त्यांना रोखणे कठीण बनल्याचे चर्चेदरम्यान समोर आले.
माकडांना आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी हाच यावरील एकमेव उपाय असल्याचे उपवनसंरक्षक यांनी सांगितले. माकडांची नसबंदी करण्याबाबतची मागणी वन विभागाने शासनाकडे केली आहे. परंतु, या संदर्भात अद्यापही परवानगी मिळाली नाही.