रत्नागिरी एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील कारागिरांनी सॅनिटायझर टनेल बनविले
रत्नागिरी एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील कारागिरांनी उपलब्ध साहित्य व कमी खर्चातून सॅनिटायझर टनेल साकारण्याची किमया साधली आहे.
पाचशे लिटरच्या पिंपात सॅनिटायझर लिक्विड ठेवले आहे. त्यातून अर्ध्या अश्वशक्तीच्या (एचपी) पंपाद्वारे ते समोरच तयार केलेल्या टनेलमध्ये जाते. टनेलमध्ये जाण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने बटण दाबल्यावर लिक्विडचा फवारा सुरू होतो. सुमारे 10 सेकंद फवारा सुरू राहतो व आपोआप बंद होतो रत्नागिरी एसटी विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, यंत्र अभियंता श्री. जगताप व उपयंत्र अभियंता रमाकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ही सॅनिटायझर टनेल कारागीर दिलीप सुर्वे, गौरेश नेवरेकर, राजेश मयेकर, विनायक साळुंखे, ललित काळे, ओंकार शितप, मुकादम, जाविद कोतवडेकर यांनी मेहनत घेतली.
www.konkantoday.com