खेड येथे एकाची ऑनलाइनमधून फसवणूक, गुन्हा दाखल
खेड तालुक्यातील कुळवंडी देऊळवाडी येथील राहणारे अविनाश निकम यांची अज्ञात इसमाने ऑनलाइनवरून अकरा हजार ९५४ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे
निकम यांना अज्ञात इसमाने मोबाइलवर फोन करून तुमच्या अकाऊंटमधून गव्हर्मेंट टॅक्सचे पैसे कट होणार आहेत असे सांगून निकम यांच्या बँक ऑफ इंडियाच्या तिसंगी शाखेतील खात्याची सर्व माहिती घेतली व ऑनलाइन गैरव्यवहार करून खात्यातून अकरा हजार रुपये ९५४ रुपये काढून घेतले याबाबत निकम यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com