
उपचारासाठी निघालेल्या इसमाचा हृदयविकाराने वाटेत मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे राहणारे दिनकर रसाळ हे उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रिक्षातून येत असता त्यांच्या वाटेत बेशुद्ध पडून हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला
मुंबई ठाणे येथील राहणारे व नेवरे येथे गावी आलेले दिनकर रसाळ यांना ब्लड प्रेशर व डायबेटीसचा त्रास होता ते तपासणी करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रिक्षातून येत असताना ते बेशुद्ध पडले त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले येथील डॉक्टर नी त्यांना मयत घोषित केले
www.konkantoday.com