
शाळांनी पालकांवर फीची सक्ती करू नये अन्यथा अशा शाळांवर थेट कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही शाळेने विद्यार्थी किंवा पालकांवर फी भरण्यासाठी सक्ती करू नये, असे आदेश देणारे परिपत्रक शासनाने अगोदरच जारी केले आहे. शाळांनी पालकांवर फीची सक्ती करू नये अन्यथा अशा शाळांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला.
राज्यातील केंद्रीय बोर्डाच्या तसेच व राज्यातील अन्य माध्यमांच्या शाळा विद्यार्थी व पालकांवर फी भरण्यसाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी खास व्हिडीओ जारी करीत शिक्षणसंस्थांना हा इशारा दिला.
www.konkantoday.com