
आंबा घाटात सापडलेला मृतदेह हा खुनाचा प्रकार
रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यांवर आंबा घाटात चक्रीवळणाजवळ दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह हा खुनाचा प्रकार असल्याचे आता शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे हा मृतदेह तरुणाचा असून त्याच्या डोक्यात हातोडा किंवा जाड लोखंडी सळीने मारहाण केल्याने त्याचे डोके फुटले होते यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही .
www.konkantoday.com