अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गोवा बनावटीची दारु वाहतुक
२जणावर गुन्हा दाखल

बांदा चेकपोस्टवर अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गोवा बनावटीची दारु वाहतुक करण्याचा प्रयत्न बांदा पोलीसांनी हाणून पाडला. पत्रादेवी – बांदा चेकपोस्टवर गोव्यातून कोल्हापूर जाणार्‍या टेम्पोतून (एमएच १० झेड ३३७०) १९ हजार ८० रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली. दारु वाहतुकीसाठी वापरलेला ४ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पोही ताब्यात घेण्यात आला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी विशाल सुभाष कोठावळे (३४, रा. शिरोळ, कोल्हापूर) व अभिजित राजेश पाटील (२६) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button