रत्नागिरीतील युवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी बनवला प्रसिद्ध गाण्यावर व्हिडीओ नक्की पाहा……
“मुस्कुराएगा इंडिया” या प्रसिद्ध गाण्यावर रत्नागिरीतील युवांनी कोरोनात नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी व्हिडीओ बनवला आहे. विशेष म्हणजे संचारबंदीमुळे एकत्र येण्याची मुभा नसल्याने प्रत्येकाने आपापल्या घरी व परिसरात वेगवेगळे शुटिंग केले. त्यानंतर ते एकत्रित करून एडिटिंग करण्यात आले. सध्या हे गाणं खूप व्हायरल होत आहे. रत्नागिरी पोलिसांनीही आपल्या ऑफिशियल पेजवर हे गीत अपलोड केले आहे. त्याला पेजवर उत्तम व्ह्यूज मिळाले असून शेअरही उत्तम होत आहे.
या गाण्याची संकल्पना अमोल श्रीनाथ यांची आहे. तर याचे एडिटिंग राजेश नंदाने याने केले आहे. तसेच या गाण्यात “अमोल श्रीनाथ, राजेश नंदाने, तृप्ती सुर्वे, शुभम नंदाने, आकाश श्रीनाथ, साहिल मोंडकर, वैभव गुरव, जगदीश वेमला, सिद्धी नाटेकर” यांनी अभिनय केला आहे.