मिरकरवाडा येथे किराणा व्यापाराला दोन तरुणांकडून पैशाच्या मागणीसाठी मारहाण ,गुन्हा दाखल

रत्नागिरी उद्यमनगर येथील राहणारे इम्रान बावानी यांच्याकडे पाच हजार रुपये मागणी करून ते न दिल्याने त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून दोन अज्ञात तरुणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
यातील फिर्यादी बावानी यांचे मिरकरवाडा येथे करून खैरुन्निसा ट्रेडर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे या दुकानात दोन तरुण खरेदी करण्यासाठी आले त्यांनी खरेदी केल्यानंतर दुकानदारांकडे पिशव्यांची मागणी केली आपण प्लास्टिक पिशव्या ठेवत नसल्याचे त्याने स्पष्ट केले त्यावरून या दोघा तरुणांनी वाद सुरू केला म्हणून फिर्यादी बावांनी यांनी या तरुणांना तुम्ही सामान ठेवा व पैसे परत घेऊन जा असे सांगून पैसे दोनशे रुपये परत दिले त्यावेळी या दोघा तरुणांनी शिवीगाळ करून बाबांनी यांना मारहाण करून त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली परंतु त्याने ते देण्यास नकार दिला त्यामुळे या तरुणाने त्यांना हातातील कड्याने मारहाण केली व ते निघून गेले याबाबत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात अज्ञात दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button