महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पुढील ५ दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस?
हवामान खात्याचा अंदाज
एकीकडे राज्यात कोरोनाच्या संकटामुळे आधीच संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली जनता आता नव्या संकटासमोर उभी ठाकली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये १६ एप्रिल ते २० एप्रिल या ५ दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यामुळे शहरी भागातल्या जनतेला थेट फटका बसणार नसला, तरी ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग मात्र हवालदील होऊ शकतो. यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांना पुढचे पाचही दिवस तर दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र या भागांना २० एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
www.konkantoday.com