तेव्हा कोणीही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही -संजय राऊत
वांद्र्यातील घटना सातत्याने चर्चेत ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात सुरतमध्ये जाळपोळीसारखा भयंकर प्रकार घडला. मात्र, त्यावर विरोधकांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. तेव्हा कोणीही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. परंतु, वांद्र्यातील घटना सातत्याने चर्चेत ठेवली जात आहे. हे सर्व ठरवून सुरु असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले
www.konkantoday.com