गोवळकोटखाडीत महसूल विभागाच्या पथकाने वाळूसह बोटी खाडीत बुडविल्या
गोवळकोटखाडीत बेकायदा वाळू उपसाचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत सुमारे दोन- दोन ब्रास असलेल्या बेवारस ९ बोटींना जलसमाधी देण्यात आली आहे. ही कारवाई प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या पथकाने केली. यामुळे वाळू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे या बेकायदा वाळू उपसा ला चाप बसावा, या करिता महसूल विभागाच्या पथकाने वाळूसह बोटी खाडीत बुडविण्यात आल्या. ही कारवाई तब्बल सुमारे ७ तास सुरू होती
www.konkantoday.com