
आज सकाळी बाहेर पडलेल्या रत्नागिरी करांवर पोलिसांकडून कारवाई
रत्नागिरी पोलिसांनी काल चालत फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या अनेक जणांवर कारवाई केल्यानंतर हा सकाळी उद्यमनगर चर्मालय रोड आदी ठिकाणी दुचाकी घेऊन रस्त्यावर बाहेर पडलेल्या अनेकांवर कारवाई केली
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि त्यांच्या पथकाने आज शुक्रवारी सकाळी ९ः५० ते ११: ०० वाजता उपविभागीय अचानक रत्नागिरी शहरातील चर्मालय तिठा, , उदयमनगर चौक परिसर येथे विनाकारण फिरणारे वाहनचालकांवर कडक कारवाई केेली.
या ठिकाणी अचानक नाकाबंदी करून पोलिसांनी ४४वाहन चालकांवर कारवाई करून विनाकारण फिरणारे वाहने जप्ती तसेच वाहनांवर हजारो रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. रोडवर किरकोळ कारणांकरीता फिरणारे लोकांना ताब्यात घेऊन बाहेर न फिरण्याबाबत समज दिली
www.konkantoday.com
