
बारावीच्या अभ्यासक्रमात चिपळूणचे भाऊ काटदरे आणि महाडचे प्रेमसागर मेस्त्री यांच्या माहितीचा समावेश
बारावीचा अभ्यास क्रम या वर्षीपासून बदलत आहे येत्या बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात बदलता भारत भाग दोनमध्ये चिपळूण येथील सह्याद्री मित्र या संस्थेचे संस्थापक भाऊ काटदरे यांच्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे बदलता भारत या विभागात पर्यावरण क्षेत्रात भाऊ काटदरे यांनी सह्याद्री मित्र संस्थेच्या माध्यमातून कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर राबवलेल्या सागरी कासव संवर्धन मोहिमेची माहिती देण्यात आली आहे त्यानी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात कोकणात मोठे काम केले आहे त्यानीआयोजित केलेल्या कासव महोत्सवाला ही देशातून विदेशातून पर्यटक भेट देत आहेत तसेच महाड येथील सिस्केप या संस्थेचे संस्थापक प्रेमसागर मिस्त्री व त्यांचे सहकारी राबवत असलेल्या गिधाड संवर्धन प्रकल्पाची माहिती देण्यात आली आहे मिस्त्री यांनी म्हसाळा तालुक्यात चिरगाव येथे गिधाड संवर्धन प्रकल्प राबविला आहे
www.konkantoday.com