एस.टी महामंडळाच्या कर्मचार्यांना दिलासा
एस.टी महामंडळाच्या कर्मचार्यांचे ७५ टक्के पगार झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील साडेचार हजार कर्मचार्यांचा ६ कोटी १७ लाख पगार जमा झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. साेमवार पर्यंत एस.टी.कर्मचार्यांचे पगार झाले नव्हते त्यामुळे कर्मचारी वर्ग काळजीत होता. मात्र आता प्रत्येक कर्मचार्यांच्या अकाऊंटमध्ये ७५ टक्के पगार जमा झाला. यावेळी पगार होईल की नाही साशंकता वाटत असताना कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला.
www.konkantoday.com