
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू फॅक्टरी आणि आंबा कॅनिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी
देण्याचा विचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे सिंधुदुर्गातही 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्यामध्ये कोणतीही शिथिलता मिळणार नाही. मात्र, जिल्ह्याची आर्थिक बाजू स्थिर राहावी या दृष्टीने काजू फॅक्टरी आणि आंबा कॅनिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व अटी, शर्ती यांची पूर्तता करून व्यावसायिकांना जर व्यवसाय सुरू करायचे असतील तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागावी, ती दिली जाईल. त्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com