रत्नागिरी शहरात नगरपरीषदेच्या वतीने सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात
रत्नागिरी शहरात कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यानंतर नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी रत्नागिरी शहरातील कुटुंबांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती नगराध्यक्ष साळवी यांनी दिली. रत्नागिरी शहरातील राजिवडा येथे कोरोनाचा रुग्ण सापडला आणि संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. त्यानंतर पालिका प्रशासनाने आपली भूमिका चोख बजावत संपूर्ण शहरामध्ये निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली. आरोग्य विभागाकडून डास फवारणी करण्यात आली, साफसफाईवर भर देण्यात आला आहे पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर टनेल बसविण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला शहरामध्ये जी कुटुंब आहेत. या सर्व कुटुबांचा सर्व्हे सुरू झाला आहे. पालिकेच्या शिक्षकांमार्फत हा सर्व्हे केला जात आहे. आतापर्यंत या सर्व्हेचे काम अंतिम टप्यात आले आहे. यामध्ये कुटुंब प्रमुख, घरातील व्यक्तींची माहिती, लहान, थोरांची चौकशी, कोण आजारी आहे का, याची माहिती घेतली जात आहे.
www.konkantoday.com