यंदा सरासरीच्या १००टक्के पाऊस होईल हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने काहीसा दिलासा दिला आहे. आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या १००टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात ९६ टक्के ते १०४टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असंही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
www.konkantoday.com