
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज्यभरातून माेठा प्रतिसाद
कोरोना युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज्यभरातून माेठा प्रतिसाद मिळाला आहे आरोग्य क्षेत्राशी सबंधित २१ हजार जणांनी कोरोना नियंत्रणाच्या कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी रितसर अर्ज केले असून आता या अर्जांची छाननी होत आहे. यानंतर या व्यक्तींना त्या त्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे.
डॉक्टर्स, आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्तसैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले इच्छुक पुढे
आले आहेत
www.konkantoday.com