बांधकाम क्षेत्रालाही लॉकडाउनचा फटका घरांच्या किंमती २० टक्क्यांनी घसरणार
करोना व्हायरसमुळे उद्योगधंदे बंद असून अनेक क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला असल्याने आर्थिक नुकसान वाढत चाललं आहे. बांधकाम क्षेत्रालाही लॉकडाउनचा फटका बसलेला असून घरांच्या किंमती २० टक्क्यांनी घसरतील असा अंदाज एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केला आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या बेविनारमध्ये ते बोलत होते.
“नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलचा १० ते १५ टक्क्यांनी किंमती घसरतील असा अंदाज आहे. पण आपण २० टक्क्यांची तयारी ठेवली पाहिजे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
www.konkantoday.com