जि.प.च्या पहीली ते पाचवीच्या अभ्यासक्रमाचे व्हीडीओ ब्लॉगवर,अडीच लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ

तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षकांनी तयार केलेल्या पहीली ते पाचवीच्या अभ्यासक्रमाचे व्हीडीओ ब्लॉगवर उपलब्ध करुन दिले आहेत. घरबसल्या अडीच हजार जिल्हा परिषद शाळांतील अडीच लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येऊ शकणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीने भारतातील सर्वच क्षेत्रांचे कामकाज थांबले आहे. त्यात शैक्षणिक क्षेत्रही मागे राहीलेले नाही. आपत्कालीन उपाय म्हणून सर्व शाळा बंद केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाची मदत घेतली जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button