वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई मागे
खेड मधील कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर खेड तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु दोनच दिवसात निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता आरोग्य खात्यामधील वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता जाणवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आराेग्य कर्मचारी संघटनेही या निलंबन कारवाईला विराेध केला हाेता
www.konkantoday.com