रेल्वेचाही प्रवासी वाहतूकीवरील निर्बंध ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय
लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.या घोषणेनंतर रेल्वेनेही प्रवासी वाहतूकीवरील निर्बंध ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ३ मेपर्यंत देशामध्ये रेल्वे सेवा बंद राहणार आहे. मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूकही त्यामुळे बंदच राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालगाड्या मात्र सुरु राहणार आहेत.
www.konkantoday.com