
दापोली-कळंबट येथील डाकपालाने केला दीड लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
दापोली : तालुक्यामधील कळंबट येथील डाकपाल शैलेश जोगळेकर याने 1 लाख 56 हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दापोलीचे डाकघर निरीक्षक ज्ञानेश्वर बोंगाणे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या संदर्भात दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश जोगळेकर हे कळंबट डाकघर येथे दि. 16 ऑगस्ट 1993 पासून कार्यरत होते. दि. 2 मे 2011 ते 4 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये कळंबट येथे शाखा डाकपाल म्हणून काम करीत होते. त्याने सुमारे 1 लाख 56 हजार रुपये जमा केले नसल्याचे उघडकीस आले आहे. या सरकारी रकमेचा अपहार झाल्याचे फिर्यादी ज्ञानेश्वर भोंगाने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी शैलेश जोगळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पड्याळ करीत आहेत.