पाणीटंचाई ग्रस्त गावाना पाणीपुरवठा करावा -जि.प अध्यक्ष रोहन बने
जिल्हा परिषदेची कार्यालयीन यंत्रणा कोरोनाप्रतिबंध लढ्यात गुंतली आहे. अशावेळी यंदाच्या वर्षी पाणीटंचाईसाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांची संयुक्त पहाणी रद्द करून कोरोनाच्या संकटात खास बाब म्हणून पाणीटंचाई ग्रस्त गावाना पाणीपुरवठा करावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com