
गेल्या बावीस दिवसांत एसटीचे १५ कोटी २६ लाख उत्पन्न बुडाले
राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातही लॉकडॉऊन करण्यात आले आहे. यामुळे एसटीच्या ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच वाहतूक बंद आहे. महाविद्यालये ,शाळा बंद करण्यात आल्याने शालेय फेर्याही बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे मागील बावीस दिवसांत एसटीचे १५ कोटी २६ लाख ५१ हजार ९२८ रुपयांचे उत्पन्न बुडाले.कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, तत्पूर्वीपासूनच रत्नागिरी विभागातील एसटी सेवा ठप्प असल्याने गेले बावीस दिवस बसस्थानकांतून कमालीचा सन्नाटा पसरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीचे काही चालक अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी मुंबई येथे गेले आहेत
www.konkantoday.com