गणेश चतुर्थीच्या 30 दिवस अगोदर रेल्वेचे आगाऊ आरक्षण सुरू करावे खासदार विनायक राऊत यांची मागणी
सध्या कोरोनामुळे उद्धभवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी मंडळींना सोयीचे व्हावे म्हणून सध्याचे रेल्वेचे 120 दिवसांचे आगाऊ आरक्षण हे रद्द करावे व गणेश चतुर्थीच्या 30 दिवस अगोदर रेल्वेचे आगाऊ आरक्षण सुरू करावे याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून विनंती केली.
www.konkantoday.com