
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कुवारबाव तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कुवारबाव खालील तातडीच्या उपाययोजना हाती घेत आहे.
*1) जिल्हाधिकारी कार्यलयाच्या धर्तीवर ग्रामपंचायत कंट्रोल सेंटर स्थापन करणे व सध्यस्थितित चालू असलेल्या जेष्ठ नागरिक टोल फ्री नंबर *18002332685* चा यासाठी वापर करणेकामी यावर कोरोना बाबत अडचणीसाठी संपर्क करणे. (24 तास)
- 02) ग्रामपंचायतीने या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विनामोबदला स्वयंसेवक नेमायचे ठरवले आहे. इछूकांनी वरील नंबर वर संपर्क साधावा.
- 03) ग्राम कृती दल व सफाई कर्मचारी यांची एकत्रित समिती नेमलेली आहे.
- 04) गावामधे प्रत्येक घराची भेट घेऊन अल्प आजारी व्यक्तीची नोंद करणे व दर दिवशी त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे .
- 05) जय भैरी मित्र मंडळ यांची रुग्णवाहिका ग्रामपंचायतीत 24 तास उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
- 06) शिवश्री हॉस्पिटलशी संलग्न राहुन तातडीचे अल्प आजारांवर उपचार करण्यात येत आहेत.
- 07) प्रत्येक घरामधे एक mask व एक sanitizer पुरवठा करण्यात येत आहे.
- 08) दर आठ दिवसांनी सोडीयम हायपोक्लोराईड ची गावामध्ये फवारणी करणेत येत आहे. (दोनदा पूर्ण झाली आहे).
- 09)कोरोना रुग्णाचे जवळ जाण्याची शक्यता असलेल्या कर्मचार्यासाठी विशेष ड्रेस ची सुविधा उपलब्ध करणेत येत आहे अशी माहितीकुवारबाव ग्रामपंचायत सरपंच
सौ. मंजिरी अभिजीत पाडळकर यांनी दिली आहे.
www.konkantoday com