
कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला
कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याबाबतची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे,अधिक सतर्कता बाळगायला हवी, कठोर पावलं उचलावी लागतील, नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं हे महत्त्वाचं आहे असे देखील त्यांनी सांगितले.20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन केले जाणार.जे क्षेत्र आपलं हॉटस्पॉट वाढू देणार नाहीत, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार करू असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले
www.konkantoday.com