सवलतीच्या धान्याचा अपहार साखरप्यातील रेशन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल

सवलतीच्या दराचे धान्य ग्राहकाला न देता त्याचा अपहार केला म्हणून साखरपा येथील सरकारी धान्य दुकानदार मधुकर माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साखरपा कोंडगाव येथे मधुकर माने हे सरकारमान्य रास्तभाव दुकान चालवतात त्यासाठी त्याला जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून परवानगी देण्यात आली होती कोंडगाव साखरपा येथील राहणारे रणधीर शिंदे यांना त्यांच्या शिधापत्रिका प्रमाणे सहा व्यक्तींसाठी माहे ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीसाठी शासनाच्या सवलतीच्या दराचे तांदूळ गहू तूरडाळ चणाडाळ यांना देणे आवश्यक होते मात्र हे धान्य शिंदे यांना न देता दुकानदार माने यांनी या धान्याचा अपहार केला म्हणून त्यांच्याविरुद्ध देवरुख पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button