शंकेश्वर पार्क गृह निर्माण सोसायटीने सभासदांना भाजीची सुविधा उपलब्ध करून दिली
रत्नागिरी शहरातील शंकेश्वर पार्क गृह निर्माण सोसायटी,जिल्हा परिषद जवळ,रत्नागिरी यानी आपल्या सभासदांसाठी भाजीची सुविधा दारात उपलब्ध करून दिली दर दोन दिवसांनी भाजीवाला येतो आणि सर्व सभासद योग्य अंतर ठेवून भाजी खरेदी करतात.अशी पध्दत तेथील सोसायटी कार्यकारिणी, सभासद,आणि खास करून सभासद पोलीस आधिकारी .शिरीष सासने यांनी पुढाकार घेऊन भाजी विक्रेत्यांना सांगून चालू केली त्यामुळे सोसायटीतील सर्व सभासदांना दर दोन दिवसांनी ताजी भाजी मिळू लागली आहे.तसेच सोसायटीचा दरवाजा बंद ठेवतात त्यामुळे बाहेरची व्यक्ती कोणी येवू शकत नाही अशी शिस्त तेथील सर्व सभासदांनी स्वतःहून आपल्या पासून सुरवात केली आहे.असे सर्व सोसायटीनी केल्यास कोरोनाच्या संकटाला नक्कीच पायबंद बसेल
www.konkantoday.com