रत्नागिरीचे सिव्हील सर्जन यांच्याबाबत तक्रारी, काेराेनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर शासन निर्णय घेणार
रत्नागिरी शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन यांच्याबाबत तक्रारी वाढत आहेत मात्र सध्या कोरोना प्रादुर्भावाची गंभीर परिस्थिती आहे ही परिस्थिती आटोपल्यानंतर त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे नामदार उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.सिव्हिल सर्जन यांच्या कारभाराबाबत व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकी बाबतच्या तक्रारी आपणापर्यंत आल्या आहेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील याबाबत तक्रारी करून दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या आवारात जमून त्याविरुद्ध आवाज उठवला होता.त्यावेळी लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून हे प्रकरण तात्पुरते मिटविले होते सध्या काेराेनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळे व सिव्हिल हॉस्पिटल हे कोरोना हॉस्पिटल असल्याने सध्या याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही मात्र तेथिल कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला म्हणून त्यांना सिव्हिल सर्जनकडून ज्या नोटीसा पाठवण्यात आले आहेत त्या मागे घेण्याचे आदेश देण्यात येतील असेही सामंत यांनी सांगितले.शासनाचे याबाबत सर्व लक्ष्य आहे सध्या चालू असलेला वाईट काळ संपल्यानंतर याबाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले त्यातूनही काही तातडीने उपाययोजना करण्याची गरज लागली तर ती केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com