
भारतीय वंशाचे वैमानिक गोपीचंद थोटाकुरा आज इतिहास रचणार
आपणं विमानातून इतर ठिकाणी जाऊन मस्त फिरून येतो. तसेच परदेशातील लोक अंतराळाची सफर करण्यासाठी रवाना होणार आहेत. आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे हे यान भारतीय वंशाचे वैमानिक गोपीचंद थोटाकुरा हे चालवणार आहेत. हे उड्डाण आज संध्याकाळी सात वाजता होणार आहे. या अंतराळ प्रवासात गोपीचंद यांची पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे. अंतराळात अशी कामगिरी करणारे ते दुसरे भारतीय ठरणार आहेत. यापूर्वी 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी ही कामगिरी केली होती. अमेरिकेत राहणारे गोपीचंद यांची ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड-25 (NS-25) मोहिमेसाठी क्रू म्हणून निवड झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जगभरातील इतर पाच अंतराळवीर क्रूमध्ये आहेत.