पिण्यासाठी असलेल्या सार्वजनिक विहिरीवर म्हैशी धुण्यास विरोध केल्याने तीन जणांना मारहाण
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील हरळ वारेवाडी येथे लोकांना पिण्यासाठी असलेल्या सार्वजनिक विहिरीवर म्हशी धुण्यास विरोध केला म्हणून प्रतिक शिंदे ,प्रभाकर शिंदे ,हेमांगी शिंदे यांना काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी आत्माराम शिंदे ,शांताराम शिंदे ,अनिल शिंदे ,अजित शिंदे या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सध्या वाडीत पाणी तुटवडा असल्याने विहिरीचे पाणी फक्त पिण्यासाठी वापरावे असा ठराव झालेला असताना आरोपी हे सार्वजनिक विहिरीवर म्हैशी धूत होते तुम्ही असे कराल तर विहिरीतील पाणी पुरणार नाही असे सांगून फिर्यादी यांनी म्हैशी धुण्यास विरोध केला त्या त्याचा राग आरोपींनी आला व त्यानी फिर्यादी यांना मारहाण केली
www.konkantoday.com