
“बेवजह घरसे निकलनेकी जरूरत क्या है”पहा रत्नागिरी पोलिसांचा शायरी अंदाज. . . .
रत्नागिरीत कोरोना हळूहळू हातपाय पसरत आहे.जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते.संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाउन आहे.पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्यास मनाई केली आहे. आता लोकांनी घरीच थांबावे म्हणून पोलिसांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. शायरीच्या माध्यमातून लोकांना आवाहन केले जात आहे. शहरातील राजीवडा, साखरतर, उद्यमनगर यासह इतर भागात पोलिसांकडून लोकांनी घरीच थांबून कोरोनाला हरवावे यासाठी आता शायरीच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे.