प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाइनचा शिक्का मारण्यास अटकाव केल्याबद्दल दापोलीत एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल
दापोली दाभीळ पांगारी येथे आरोग्य रुग्णांची तपासणी करून त्याला होम क्वारंटाइन चा शिक्का मारण्यासाठी गेलेल्या आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून शिक्का मारण्यास अटकाव केल्याच्या आरोपावरून दाभिळ पांगारी येथील जावेद महम्मद साहेब खतिब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली फणसु येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक रावसाहेब हंकारे हे व आरोग्य विभागाचे इतर कर्मचारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे दापोली येथील दाभिल पांगारी येथे जावेद महम्मद साहेब खतीब यांचे घरी गेले होते त्यावेळी त्यांनी खतीब यांची वैद्यकीय तपासणी करून होम क्वारंटाइन शिक्का मारणे करिता गेले असता खतीब यांनी हंकारे यांना तुम्ही डॉक्टर आहात का सरकारी नोकर असे विचारून त्यांचेशी अशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.आरोग्यसेवक आपले सार्वजनिक कार्य पार पाडीत असताना त्यांना विरोध करून होम कोरंटाइनचा शिक्का मारण्यास अटकाव केला व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून खतिब यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आला आहे
www.konkantoday.com